बुलढाणा : मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत पोलिसांनीच ठोकरले तीन वाहनांना; वाचा सविस्तर

460 0

बुलढाणा : बुलढाणामध्ये एका विचित्र अपघातात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये जीवित हानी झाली नसली तरी धक्कादायक म्हणजे सामान्यांना दारू पिऊन गाडी चालवू नका म्हणून ताकीद भरणाऱ्या पोलिसांनीच मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवून या तीन वाहनांना जोरदार धडक दिली आहे.

बुलढाण्यातील खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कैलास हटकर यांनी मध्यधंद अवस्थेत तीन वाहनांना जबर धडक दिली आहे. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी झाडावर जाऊन आदळली,आणि गाडीच्या एअरबॅग्जमुळे पोलीस कर्मचाऱ्याचा जीव बचावला असला तरी या तीनही वाहनांचं मोठे नुकसान झालं असल्याचा समजते. या घटनेमध्ये जीवित हानी झाली नाहीये. परंतु आता या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Share This News
error: Content is protected !!