चुकूनही ठेऊ नका ‘हे’ सामान्य पासवर्ड; अन्यथा तुमचा मोबाईल होऊ शकतो काही सेंकदात हॅक

287 0

पासवर्ड जितका सोपा असेल तितका तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते.आपला फोन आपला ई-मेल आणि सोशल मीडियासह इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा वापर करावा लागतोच.मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने धोकादायक पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे पण असेच पासर्वड असतील तर आताच बदलून टाका. नेमके कोणते पासर्वड वापरू नये याबद्दल जाणून घ्या…

जर तुम्ही बहुतेक सोशल मीडिया खात्यांवर सक्रिय असाल, तर तुम्ही तुमच्या खात्यांसाठी एक पासवर्ड निवडता जो सोपा आहे आणि सहज लक्षात ठेवता येईल असे पासर्वड वापरताय. तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण 2022 वर्षात सर्वात लोकप्रिय आणि सामान्य पासवर्डची यादी NordPass ने शेअर केली आहे. यापैकी एक पासवर्ड तुमचाही असू शकतो. आपण सामान्य पासवर्डची लिस्ट बघुया.

Password , 123456 , 12345678 , bigbasket, 123456789, pass@123, 1234567890, anmol123, abcd123, 123123, abcd1234, 1234, password1, welcome, 654321, computer, 123, Googledummy

पासवर्ड शक्यतो मोठा ठेवा आणि त्यात चिन्हे, संख्या आणि अक्षरांचा वापर करा. असे पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण होते, मात्र डेटा सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे. प्रत्येक अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. त्यामुळे हॅकर्संना पासवर्ड क्रॅक करणे सोपे जात नाही. याशिवाय वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!