धक्कादायक : वरळी सीलींक जवळ समुद्रात बुडाली 5 मुले; दोघांचा मृत्यू , तींघावर उपचार सुरू

405 0

मुंबई : वरळीतील विकास गल्ली, हनुमान मंदिर, कोळीवाडा येथे ५ मुले दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुंबई अग्निशमन दल पोहोचण्या आधीच त्यांना समुद्रातून बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी या मुलांना खासगी वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता कार्तिक चौधरी ८ वर्षे, सविता पाल १२ वर्षे या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

१३ वर्षीय कार्तिक गौतम पाल (वय १३) या मुलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या प्रकृतीची माहिती उपलब्ध झालेली नाही. आर्यन चौधरी १० वर्षे या मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

तारा ओम पाल या १४ वर्षीय मुलावर उपचार सुरु आहेत. हे सर्व मुलं वरळी परिसरातील आहेत. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाउन या मुलांच्या कुटुंबियांना भेट देत जखमी मुलांच्या कुटुंबियाची विचारपूस केली आहे.

Share This News
error: Content is protected !!