Breaking News : पुण्यात काँग्रेस भवनमध्ये भाजपचं आंदोलन, प्रचंड गोंधळ, पोलिसांची धरपकड.. VIDEO

534 0

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यामध्ये जोरदार निदर्शने सुरूच आहेत. आज पुण्यात काँग्रेस भवना बाहेर भाजपन आंदोलन केले. तर राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर देखील काळ फासण्यात आला आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचा देखील पाहायला मिळालं. या घटनेने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड देखील केली आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.

या भाजपच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Share This News
error: Content is protected !!