“या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, ज्या चांगल्या शिकलेल्या आहेत…!” श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

247 0

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने निघृण हत्या केली. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने गुन्हा कबूल केला असून सध्या पोलीस त्याच्याविरुद्ध पुरावे जमा करत आहेत. अफताबने श्रद्धाची हत्या अत्यंत शांत डोक्याने केली. तिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या शरीराचे 36 तुकडे केले गेले. नवीन फ्रीज घेऊन ते तुकडे त्यामध्ये ठेवून रोज एका तुकड्याची विल्हेवाट लावली. या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असताना केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या वक्तव्याने आगीत तेल टाकण्यातच काम केलं आहे.

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यानी म्हटलंय कि, ” या घटना अशा मुलींसोबत होत आहेत, त्या चांगल्या शिकलेल्या आहेत. ज्या मुलींना असं वाटतं की आपण आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो, ती क्षमता आपल्यात आहे, असं वाटणाऱ्या मुलींसोबत असे प्रकार घडत आहेत. लोक लिव ईन रिलेशनशिपमध्ये का राहतायत? त्यांना तसं राहायचं असेल तर त्याची नोंदही कुठेतरी घेतली गेली पाहिजे. जर अशा व्यक्तींच्या पालकांना त्याचं नात सार्वजनिक जीवनात अमान्य असेल, तर अशा जोडप्यांनी कोर्टात जाऊन लग्न करावं आणि मग एकत्र राहावं. शिकलेल्या मुलींनी अशा प्रकारचं नातं जोडू नये. शिकलेल्या मुली आई वडिलांची मर्जी नाकारुन असा निर्णय घेत असतील तर या प्रकारांसाठी त्या स्वतः जबाबदार आहेत. शिकलेल्या मुलींनी नेमकं असं त्या का करत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे.”

Share This News
error: Content is protected !!