सिंहगड किल्ल्यावर ‘प्लॅस्टिक बंदी’ होणार अधिक कडक; बंदीचं पालन न केल्यास भरावा लागेल दंड

329 0

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आता प्लास्टिक बंदी अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे पदार्थ गडावर विकण्यास आणि नेण्यास मनाई असणार आहे.

रोज शेकडो पुणेकर आणि बाहेर शहरातून पुणे दर्शनासाठी आलेले पर्यटक आवर्जून सिंहगडावर जातात.गडावर मिळणाऱ्या पिठलं- भाकरी आणि कांदा भजींबरोबरच प्लास्टिकच्या आवरणातील पदार्थही मोठ्या प्रमाणात विकले जातात.गडावर सगळ्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे आणि येत्या सोमवारपासून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

बंदीचं पालन न करणाऱ्यांकडून शंभर ते पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल, असं वन विभागाने म्हटलं आहे. कारवाई करूनही सिंहगड किल्ला प्लॅस्टिकमुक्त होतो का ? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Share This News
error: Content is protected !!