पुणे : पतित पावन संघटनेचे सावरकरांच्या विरोधात विधान केल्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड़े मारून निदर्शन

495 0

पुणे : पतित पावन संघटना पुणे शहर कर्वे रस्त्यावरिल स्वातंत्र्यवीर स्मारका बाहेर स्वा. सावरकर ह्यांच्या विरोधात विधान करणाऱ्या खासदार राहुल गांधी विरोधात त्याच्या प्रतिमेला जोड़े मारून निदर्शने करण्यात आली .

ज्यांनी भारताचे तुकडे केले ते आता भारत जोड़ो यात्रा काढतायत, दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना झाली याउलट ह्यांना अगाखान पॅलेसमधे पंचतारांकित सुविधांमधे ठेवण्यात आले होते, भगतसिंग,राजगुरु यांची फाशी हेच रोखू शकत होते तरीही ह्यांनी स्वतःच्या हव्यासासाठी त्यांचा बळी दिला, इंग्रजांच्या मर्जितली आंदोलने ह्यांच्या घरण्यातल्यांनी केली, संविधाना विरोधात जाऊन ह्यांनी प्रभू श्री राम हे काल्पनिक आहेत अशी याचिका दाखल केली. आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह बोलतायत, भारत जोड़ो यात्रा काढणाऱ्यांनी संपूर्ण देशात जातीय तेढ निर्माण करुण समाज दुभंगवला याउलट ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी सर्व प्रकारे सर्व मार्गंनी प्रयत्न करुन समाजातील सर्व जातीय भेद घालवन्यसाठी प्रत्यक्ष भरिव कार्य केले त्यांच्या विरोधात कटकारस्थान करून बदनामी केली जात आहे असे संघटनेचे प्रवक्ते स्वप्नील नाईक यांनी सांगितले.

त्यावेळी संघटनेचे श्री शिवाजीराव चव्हाण, सीताराम खाड़े, दिनेश भिलारे, विश्वास मनेरे, स्वप्निल नाईक, गणेश जाधव, रवी भांडवलकर, संतोष शेंडगे, गुरु कोळी, बाळा कांबळे, पीयूष वाईकर, यादव पुजारी, विजय क्षीरसागर, अरूण मारणे, राम जोरी, समीर सावंत, सिधु लोखंडे, दिपक काळभोर, आप्पा पोटे, जय वाढवने, बबलू थोरात, अनिल सातपुते, राहुल शिंदे, गणेश कांबळे, शैलेश कालेकर, विष्णु लाचुरे, राजू खाड़े, संतोष गुरु, योगेश करपे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!