मुंबई : ऐश्वर्या रॉय ही एक विश्वसुंदरी आहे. तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्तम भूमिका करून आपले अभिनय कौशल्य देखील सिद्ध केले आहे. 2007 मध्ये तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न गाठ बांधून बच्चन परिवाराची सून झाली. त्यानंतर तिने बॉलीवूड पासून अंतरच निर्माण करायला सुरुवात केली. 2011 मध्ये ऐश्वर्या-अभिषेकच्या आयुष्यात आराध्या आली.
आपल्या लाडक्या लेकीच्या संगोपनामध्ये आई ऐश्वर्या बराच वेळ घालवते. दोघांचेही त्यांच्या लाडक्या लेकीवर खूप प्रेम आहे. सध्या ऐश्वर्या ट्रोल होतीये ते तिच्या एका लीप किस करतानाच्या फोटोमुळे… तर झालं असं की आज आहे आराध्याचा वाढदिवस, त्यानिमित्ताने ऐश्वर्याने तिच्या मुलीसोबतचा एक खास फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे हा आहे तो फोटो…
याच फोटोवरून आता युजर्स ऐश्वर्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की, हे चांगलं नाही… तसेच तुझ्या मुलीवर तुझं किती प्रेम आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण हा फोटो खूप अति आहे.
तर काहीजणांनी ऐश्वर्याची बाजू देखील घेतली आहे. एकाने लिहिल आहे की, “आई आणि मुलीच्या प्रेमाला तरी समजा… काही जण उगाचच या फोटोवरून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतात.. !