MAHARASHTRA POLITICS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

348 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट झाली. दोन्ही नेत्यांची सुमारे 15 ते 20 मिनिटे दाराआड चर्चा झाली त्यामुळे अनेक विषयांना तोंड फुटल आहे.

या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, कोणतंही नवीन राजकीय समीकरण निर्माण होत नाहीये प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली या चर्चेचा विषय होता इंदू मिल स्मारकाबाबत…! भेटीमागे कोणतही राजकारण नाही, त्यामुळे कोणताही राजकीय अर्थ काढू नका. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

तसेच बाबासाहेबांची वास्तू पाहणं हाच या भेटीचा हेतू होता. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असं त्यांनी सांगितलं आहे. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेले या वास्तूत आल्यावर एक वेगळंच समाधान लाभलं. या वास्तुत बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू त्यांच ग्रंथालय अजूनही जशास तसे आहेत. ही वास्तु बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे या इमारतीला पिलर नाहीत. हा सर्व आपला ऐतिहासिक ठेवा आहे. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहेत.

Share This News
error: Content is protected !!