Breaking News

पुणेकर पाळीव प्राणी मालकांनो सावधान ! प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास होणार दंड

228 0

पुणे : पुणेकरांनो आपल्या पाळीव प्राण्यांना तुम्ही सार्वजनिक ठिकाणी फिरवत असाल तर सावधान…पाळीव प्राण्यांना फिरवताना प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास यापुढे प्राणी मालकाला दंड भरावा लागणार आहे. पुणे महापालिकेने तशा सूचना केल्या आहेत.

पुण्यात अनेक घरांत पाळीव प्राणी हमखास दिसतो. या प्राण्यांना प्रातःविधीसाठी प्राणी मालक हे घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी घेऊन जातात. मात्र, आता आपल्या घरच्या प्राण्याला असे बाहेर घेऊन जाणे मालकांना महागात पडणार आहे. पुणे पालिकेने एक नवा निर्णय जाहीर केला आहे.महापालिकेचा घनकचरा व्यस्थापन विभाग ही जबाबदारी सांभाळणार आहे. घरातील पाळीव कुत्री आणि मांजरांचा या निर्णयात समावेश आहे.

पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी विष्ठा केल्यास थेट मालकाला दंड ठोठावला जाणार आहे. सार्वजनिक परिसर प्राण्यांच्या विष्ठेमुळे अस्वच्छ होत असून, दुर्गंधी पसरते. तसेच अनेक पादचारी मार्ग, रस्ते देखील खराब होत आहेत. त्यामुळे महापालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. याची पहिली कारवाई ही कोथरूड येथे करण्यात आली असून 500 रुपये दंडही वसूल करण्यात आलाय.

Share This News
error: Content is protected !!