BIG NEWS : विनयभंग केसमध्ये ठाण्याच्या न्यायालयाचा मोठा निर्णय; जितेंद्र आव्हाड यांना..

497 0

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर काही अटी व शर्तींवर आव्हाड यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याच अर्जावर ठाण्याच्या न्यायालयात सुनावणी पार पडली असून ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडताना म्हंटले आहे कि, घटनास्थळी प्रचंड गर्दी होती. असं सांगताना आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते. तसंच महिलेने याआधी दोन पुरुषांना धक्काबुक्की केली होती असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!