ASHISH SHELAR : “जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यायचा असल्यास द्यावा; आम्ही ती जागा लढवून जिंकू…! “

366 0

मुंबई : हर हर महादेव चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई आणि आता पुन्हा एकदा विनयभंग सारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून राजीनामा देणार असल्याचं घोषित करून टाकलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटला आहे की, “आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या आरोपांचा संबंध काय? हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंड स्टेशन आले का विचारण्यासारखा आहे. जर का ते निर्दोष आहेत तर त्यांनी कायदेशीरपणे त्यांची बाजू लढवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला आपले निर्दोष त्व सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण ज्यावेळी त्यांना निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल तेव्हा असे प्रकार केले जातात. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा काहीही संबंध नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी तो द्यावा आम्ही ती जागा लढवून जिंकू असे यावेळी आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!