भारतात 14 नोव्हेंबरलाच का साजरा करतात बालदिन? ‘हे’ आहे खास कारण

400 0

लहान मुलं ही देवाघराची फुलं असं म्हटलं जातं. लहान मुलांना देवाचे रूपही मानले जातं. अनेक देशांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. तर भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. देशात 1964 पासून या दिवशी बालदिन साजरा केला जातो. या मागचं कारणही विशेष आहे. जाणून घेऊया आजच्या TOP NEWS INFO मध्ये बालदिन का साजरा केला जातो. 

जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये ‘बाल दिन’च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला.

See the source image

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!