शुक्रवारच्या सायंकाळी घरात लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी अवश्य लावा हे श्लोक; अशी करा पूजा !

392 0

आज शुक्रवार म्हणजेच महालक्ष्मी मातेच्या उपासनेचा दिवस आहे. आजच्या दिवशी महालक्ष्मीसाठी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेदरम्यान अवश्य गोडाचा नैवेद्य ठेवा. तुपाचा दिवा आणि सुगंधी उदबत्ती लावून लक्ष्मी मातेसमोर आपली मनातली इच्छा बोलून दाखवा.

त्यासह आजच्या दिवशी स्वतः म्हणू शकला तर उत्तम किंवा घरामध्ये सर्वात प्रथम विष्णुसहस्रनाम त्यानंतर श्री सूक्त अवश्य लावा.

जर तुम्हाला स्वतःला श्री सूक्त म्हणता येत असेल तर उत्तर दिशेकडे तोंड करून पाच,सात,अकरा असे आपल्या इच्छेनुसार श्री सूक्त पठण करा. आज लक्ष्मी नक्की तुमच्यावर कृपा करेल.

घरातील कर्त्या पुरुषाच्या मेहनतीला भाग्याची जोड मिळेल. त्यामुळे आजच्या दिवशी केलेल्या या उपायाने घरातली दारिद्र्य, लक्ष्मीचे अस्थैर्य अवश्य दूर होईल.

Share This News
error: Content is protected !!