Breaking News

महापालिका निवडणुकांचा फैसला पुन्हा लांबणीवर; 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

280 0

पुणे : राज्यातील महापालिकांच्या लांबलेल्या निवडणुका नक्की कधी होणार यासंदर्भातला फैसला पुन्हा लांबणीवर पडला असून सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकेवर गुरुवारी सुनावणी होऊ शकली नाही आता 17 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितलं जात आहे. 

पुणे,पिंपरी-चिंचवड मुंबईसह राज्यातील 23 महापालिकांचा कार्यकाळ संपून सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असून सध्या या महापालिकांमध्ये प्रशासक कारभार पाहत आहेत महाविकास आघाडी सरकार असताना या निवडणुकांसाठी तीन सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय झाला होता मात्र राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्ते देतात 2017 च्या प्रभाग रचनेनुसार अर्थात चार सदस्य प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका पाणी का निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आक्षेप याचिका दाखल केली असून या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होती मात्र याचिका प्रत्यक्षात सुनावणीसाठी येऊ न शकल्याने आताही सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं

Share This News
error: Content is protected !!