पुणे : काल दिनांक १०•११•२०२२ रोजी राञी ११•३२ वाजता अग्निशमन दलाकडे वानवडी, शिवरकर गार्डनच्या मागे शिवरकर चाळ येथे घराला आग लागल्याची वर्दि प्राप्त झाली. त्याचवेळी प्रथम कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन व बुद्रुक येथून टँकर रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचताच सदर चाळीमधे पञ्याचे बांधकाम असलेल्या काही घरांना आग लागल्याचे दिसून येताच जवानांनी पाण्याचा मारा चोहोबाजूंनी सुरू करत घरामधे कोणी अडकले नसल्याची खाञी केली. आगीची तीव्रता पाहून घटनास्थळी असणारया अग्निशमन अधिकारयांच्या मागणीवरुन दलाकडून अतिरिक्त मदत रवाना करण्यात आली होती. सदर ठिकाणी पुणे अग्निशमन दलाचे ०४ फारयगाड्या व दोन वॉटर टँकर आणि पुणे कॅन्टोमेंट विभागाची ०१ फायरगाडी दाखल होत आग विझवण्याची कार्यवाही करण्यात आली. दलाकडून सुमारे सुमारे २० मिनिटात आग आटोक्यात आणत पुढील धोका टाळण्यात आला. तसेच आग पुर्णपणे राञी १२•३३ वाजता विझवण्यात यश आले.
अग्निशमन दल वेळात पोहोचत आग विझवल्याने इतर घरांचा आगीपासंन बचाव झाला व आग इतरञ पसरली नाही. या आगीमधे कोणीही जखमी वा जिवितहानी नाही. सदर ठिकाणी आगीमधे एका घरगुती सिलेंडर फुटला असून एकुण ०४ घरे पुर्ण जळाली तर इतर ०३ घरांना झळ लागली आहे. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या ठिकाणी गृहपयोगी सर्व वस्तू जळाल्याने कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महावितरण विभाग व पोलिस दल दाखल झाले होते.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे वाहनचालक समीर तडवी, दिपक कचरे, संतोष गायकवाड तसेच जवान निलेश लोणकर, राहुल नलावडे, विशाल यादव, प्रकाश शेलार, जितेंद्र कुंभार, संदिप पवार यांनी सहभाग घेतला.
अग्निशमन वाहने
१) कोंढवा खुर्द
२) कोंढवा बुद्रुक
३) बी टी कवडे रोड
४) गंगाधाम
५) पुणे कॅन्टोमेंट
६) कोंढवा बुद्रुक वॉटर टँकर
७) मुख्यालय जंम्बो वॉटर टँकर