High Profile Cyber Crime Case : सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांना कोटींचा गंडा; उच्चशिक्षित ४ आरोपी बिहारमधून ताब्यात; गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता, वाचा सविस्तर

624 0

पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना कोट्यावधींचा गंडा घातलेल्या चार उच्चशिक्षित आरोपींना पुणे पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे या हाय प्रोफाईल सायबर क्राईम केसमध्ये आणखीनही काही राजकीय व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यवसायिक देखील अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

ही घटना आहे ७ सप्टेंबरची… सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांचा वैयक्तिक नंबर हॅक केला. या वैयक्तिक नंबर वरून काही कोट्यावधींची रक्कम एका ठराविक बँक अकाउंटवर ट्रान्सफर केली जावी असा मेसेज सिरम इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर सतीश देशपांडे यांना केला गेला. अर्थात अदर पुनावाला यांच्या वैयक्तिक नंबर वरून केला गेलेला हा मेसेज असल्यामुळे ही रक्कम देखील ट्रान्सफर केली गेली होती.

फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ लगेचच बंद गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करण्यात आली. आणि त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून शीताफिने या चार उच्चशिक्षित आरोपींना बिहारमधून ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे अशा घटनांमधून काही बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तिमत्व देखील गंडवले गेले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

या ओरोपींकडून अधिक चौकशी केल्यानंतर आता अधिक धक्कादाय खुलासे देखील होऊ शकतात. एकंदरीतच या प्रकरणावरून या कोट्याधिशांना घातला जाणारा गंडा, व्हीआयपी असलेले नंबर देखील हॅक करून त्यावरून पैशांची केली जाणारी मागणी… हे खूप गंभीर प्रकरण आहे. हे चारही आरोपी उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे अगदी सामान्यांनी देखील यापुढे कोणतेही ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना चौकसपणे करावे आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे लक्षात येते.

Share This News
error: Content is protected !!