One Nation One Election : देशात एकाच वेळी होणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले…
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात एकाच वेळी घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात एकाच वेळी घेण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे. मात्र हा धोरणात्मक निर्णय असून तो केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे केंद्र सरकारनेच याचा निर्णय घ्यायचा आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन वर चर्चा सुरू होती यावरच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली आहे.
