धक्कादायक : पुण्यात येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात दगडफेक

334 0

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहातून एक धक्कादायक वृत्त समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे. हि दगडफेक नक्की कोणत्या कारणावरून झाली हे समजू शकले नाही. परंतु या दगडफेकीला थोपवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलीस हवालदाराला देखील मारहाण करण्यात आली आहे.

येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेपरेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर 27 ते 31 च्या जवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी समीर शकील शेख, तरंग परदेशी, निलेश गायकवाड, पुरुषोत्तम वीर, देवा जाधव या आरोपींच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!