अनेकींना केस गळणे, केस पातळ असणे, चमक नसणे, कोरडे आणि निर्जीव केस यामुळे मोठे केस ठेवण्याची देखील इच्छा होत नाही. पण तुमचे केस मोठे असो किंवा लहान शाम्पू सोबत फक्त हे पदार्थ एकत्र करून लावले तर केस नक्की घनदाट चमकदार दिसतील ,यात शंका नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय तुमचा सर्वात कमी वेळ घेईल.
यासाठी एका मिक्सर जारमध्ये सर्वात प्रथम 15 ते 20 कढीपत्ताचे पाने घ्या. यामध्ये एक चमचा साखर आणि एक ताजा कोरफडीचा गर काढून टाका हे मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आणि या मिश्रणामध्ये तुम्ही नेहमी वापरतात तो शाम्पू आणि थोडे पाणी घालून याने आता तुमचे केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून जर तुम्ही दोन वेळा केस धुत असाल तर हे मिश्रण करून केस नक्की धुऊन पहा. अगदी दोन वॉशमध्ये देखील तुम्हाला फरक जाणून येईल.