गुरुनानक जयंती विशेष माहिती, वाचा सविस्तर

481 0

गुरू नानक गुरपरब किंवा गुरू नानक जयंती हे पहिल्या शिख गुरु, सिंधी गुरू (गुरू नानक) यांचे जन्मदिवस साजरा करणारे सण आहे. हा सर्वात पवित्र सण शिख, सिंधी लोकांचा आहे. या दिवसाला प्रकाश उत्सव अशी संबोधिले जाते. कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरू नानकदेव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

See the source image

गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त भारतभरात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. या दिवशी गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात. नानकदेव यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. लंगर म्हणजे प्रसादाचे वाटप होते.

गुरू पुरव या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात. दिवसाच्या या वेळेला अमृत वेळ असे म्हंटले जाते. पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या जातात. कथा आणि कीर्तन यांचे आयोजन केले जाते. लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे. सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येवुन येथे प्रसाद स्वीकारतात. संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केल्या जातात. लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात. मध्यरात्री जन्मउत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात. या सर्व प्रार्थना गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातील आहेत.

माहिती स्रोत : गुगल

Share This News
error: Content is protected !!