‘हर हर महादेव’ चित्रपटावरून पुण्यातील वातावरण तापले; संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका

520 0

पुणे : ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून पुण्यातील वातावरण तापले आहे. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप संभाजी राजे छत्रपती यांनी केला. या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असं त्यांनी म्हटले आहे.

‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या दोन चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला. तर चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना ‘जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे’! असा इशारा दिला.

Har Har Mahadev |Official Trailer|Marathi|25th Oct 2022|Subodh B|Abhijeet S D|Sharad K| Zee Studios – YouTube

दरम्यान पुण्यामध्ये देखील संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हर हर महादेव या चित्रपटावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेऊन पिंपरी चिंचवड मधील शो बंद पडले आहेत. त्याचबरोबर मंगला थेटर येथील हर हर महादेव चा देखील शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडला आहे.

Share This News
error: Content is protected !!