CRIME NEWS : मैत्रिणीपासून सुटका करून घेण्यासाठी अपहरण करून केले असे कृत्य; आरोपी पत्रकार ताब्यात

193 0

पिंपरी चिंचवड : मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून एका पत्रकाराने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण करून नदीपात्रामध्ये टाकून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्या. प्रकरणी या पत्रकारास ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये एका वेब पोर्टलसाठी काम करणारे पत्रकार रामदास तांबे वय वर्षे 30 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आली आहे. चंद्रमा सीमांचल मुनी वय वर्ष 28 असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.

या तरुणीने आपल्या वडिलांच्या संपत्तीला मिळवण्यासाठी संबंधित पत्रकार आरोपी यांच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट पटत नसल्याने या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. जर मदत केली नाही तर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी तिने दिली होती. म्हणून तिच्यापासून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले आणि त्यानंतर नदीपात्रामध्ये तिची विल्हेवाट लावली असे या पत्रकाराने सांगितले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!