HAIR CARE : थंडीमध्ये होणाऱ्या केस गळतीसाठी, हिनाचा हा हेअरपॅक नक्की ट्राय करा

352 0

केस गळती हि अगदी नैसर्गिक आहे . त्यासह अनेक जण केस वाढत नाहीत ,ड्राय राहतात, फाटे फुटणे किंवा पांढरे होण्याच्या तक्रारी असतात. अर्थात हे सर्व नैसर्गिक आहे. पण या सर्व तक्रारींवर हिना पॅक चांगला गुणकारी ठरू शकतो.

सर्वात प्रथम नैसर्गिक मेहेंदी घ्या. केमिकल विरहित मेहेंदी चांगली तपासून घ्या. एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. यामध्ये आता १ चमचा कॉफी, १ चमचा चहा, आणि चांगला मूठभर कडीपत्ता घाला. चांगले उकळू द्या. हे पाणी निम्मा ग्लास अंदाजे आटले कि हे गाळून घेऊन त्यापाण्यात मेहेंदी भिजवा. पाणी कोमट असतानाच मेहेंदी भिजवा. हे आता चांगले घोळून घेऊन रात्रभर ठेवा.

सकाळपर्यंत मेहेंदी चांगली फुलून येईल. सकाळी यामध्ये १ अंडे घालून एकसारखे फेटून घ्या. या मेहेंदीमध्ये गाठ राहणार नाही असे हे चांगले हलवून घ्या. आता स्वच्छ धुतलेल्या केसांवर हि मेहेंदी अल्पाय करा. १ तासाने धुवून टाका.

See the source image

केस सुटणं कोमट पाण्याने धुवा. मेहेंदी स्वच्छ निघाल्यानंतर चांगल्या शाम्पूने धुवून कंडिशनिंग करा. नैसर्गिक पद्धतीने केस वाळवून चांगले सिरम लावा. याने केसांना चांगले पोषण मिळते.

Share This News
error: Content is protected !!