… म्हणून एलन मस्क यांनी घेतला ‘हा’ कठोर निर्णय; भारतातील 7500 कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा फटका

290 0

ट्विटरचे मालकी हक्क अलों मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तब्बल 7500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. हा कठोर निर्णय घेण्याचे कारण कंपनीला सध्या दिवसाला चार दशलक्ष डॉलर्स तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे दुर्दैवाने कोणतेही पर्याय माझ्याकडे उरत नाहीत. असे ट्विट करून त्यांनी त्यांच्या या निर्णयाला पुष्टी दिली आहे.

त्याचबरोबर बारा तासांची ड्युटी आणि सात दिवस काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मस्क यांनी भारतातील संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीमला काढून टाकल आहे. तर इंजीनियरिंग सेल्स आणि पार्टनरशिप टीमवरही याचा मोठा परिणाम झाला असल्याचे समजते. त्यासह १२ तास आणि आठवड्याचे ७ दिवस काम करण्याचे कडक नियम एलन मस्क यांनी घातले आहेत.

आणखीन एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून कंपनीचा महसूल वाढला जाईल. त्यासह मायक्रो ब्लोगिंग साईटचे बनावट व्हेरिफाइड अकाउंट्स पासून संरक्षण होईल यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे एलन मस्क यांनी सांगितले. आता व्हेरिफाइड अकाउंट्स अर्थात ब्लूटिकसाठी महिन्याला 660 रुपये भरावे लागणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide