पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे निधन

738 0

पुण्याच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं त्या 69 वर्षाच्या होत्या.
मागील एक वर्षापासून त्या आजाराने त्रस्त होत्या आज सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली

आंदेकर कुटुंब राजकारणात आलं तेव्हापासून 1-2 नगरसेवक नेहमी महापालिकेत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून निवडून येतात.

सुरेश कलमाडी यांचं पुणे शहर काँग्रेस व पुणे महानगरपालिकेवर वर्चस्व होतं त्यावेळी त्यांनी वत्सला आंदेकर यांची सन 1998-99 मध्ये पुणे शहराच्या महापौरपदी निवड केली होती

आज सायंकाळी सहा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत

Share This News
error: Content is protected !!