पुणे : कात्रज घाटात भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

684 0

पुणे : कात्रज घाटात एका अपघातामध्ये आज एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती, की या अपघातामध्ये अमोल टकले या 18 वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यासह पवन जाधव हे देखील गंभीर जखमी झाले असल्याचे समजते. 

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कात्रज घाटामध्ये एका दुचाकीवर अमोल टकले आणि पवन जाधव हे खेड शिवापुरच्या दिशेने पुण्याकडे येत होते. तर बस ही कोल्हापूरकडे जात होती. या दोन्ही वाहनांचा आज मोठा अपघात झाला. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!