भाजपने सोपवली चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी; महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

245 0

मुंबई : उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाची जबाबदारी होती. खापरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्या नंतर भाजपने आता चित्रा वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. चित्रा वाघ यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

चित्रा वाघ यांनी आत्तापर्यंत अनेक वेळा विरोधी पक्षातील नेत्यांसह सामान्य महिलांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी प्रखर भूमिका मांडली आहे त्यामुळेच त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारा मध्ये पहिल्या टप्प्यात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्याकडे ही मोठी जबाबदारी गेल्यानंतर पंकजा मुंडेंना भाजपने पुन्हा एकदा डावले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

Share This News
error: Content is protected !!