SUSHAMA ANDHARE : “दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत, आता पहिल्यांदा परत येणारे कोणी असतील तर ते…”

454 0

मुंबई : सुषमा अंधारे यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. संजय शिरसाट लवकरचं ठाकरे गटात परत येतील. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचंही अंधारे यांनी म्हंटलंय.

सुषमा अंधारे म्हणाल्या, दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत. मातोश्री सर्वांना जवळ करते. मला असं वाटतं की, आता पहिल्यांदा परत येणारे कोणी असतील, तर ते संजय शिरसाट असतील. संजय शिरसाट सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. परेशान आहेत. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.

See the source image

उलट, संभाजीनगरमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि सांदीपान भुमरे अशा तीनही लोकांना मंत्रिपदं मिळालीत. त्यामुळं संजय शिरसाट यांची मंत्रिपदाची आशा मावळली.शिंदे गटाकडून काही कार्यकारिणीची पदं जाहीर झाली. त्यातही संजय शिरसाट यांना काहीही मिळालं नाही. त्यामुळं ते ठाकरे गटात परतणारे पहिले आमदार असतील, असे सुषमा अंधारे यांचे म्हणणे आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide