महाराष्ट्र केसरी वादाच्या भोवऱ्यात; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

359 0

वर्धा : कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार बाळासाहेब लांडगे यांना नाही. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. मामासाहेब माेहाेळ यांचे नातेवाईक मुरलीधर यांना यंदाच्या अधिवेशनाचा मान देण्यात आला आहे. परंतु लांडगे यांना माेहाेळही चालत नाही आणि आम्ही असे मत खासदार रामदास तडस यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयाेजनावरुन रंगलेल्या वादावर व्यक्त केले आहे.

याबाबत खासदार रामदास तडस म्हणाले बाळासाहेब लांडगे यांना स्पर्धा आयाेजनाचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अगोदरच बरखास्त झाली आहे. ऑल इंडिया कुस्तीगीर संघाने ती बरखास्त केली आहे. बाळासाहेब लांडगे यांनी भ्रष्टाचार केला. दहा वर्षात राष्ट्रीय स्पर्धा आयाेजित केल्या नाहीत. महासंघाच्या पत्रांना उत्तर दिलं नाही. त्यामुळे बाळासाहेब लांडगे महासचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद बरखास्त झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!