कपाळावर टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकारासोबत संभाजी भिडेंनी केलेल्या वर्तवनुकीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल

504 0

पुणे : महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही, म्हणून संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देण्यास थेट नकार दिला. या प्रकरणी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे. आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली लावली नाही म्हणून, महिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा तात्काळ सादर करावा” असे पत्रक रूपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना पाठवले आहे. यावर आता संभाजी भिडे काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!