मोठी बातमी : जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट; 10 मजूर ठार झाल्याची भीती

309 0

जालना : महाराष्ट्रातील जालना येथे एक मोठा अपघात झाला आहे. जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळी स्टील वितळणाऱ्या भट्टीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, भट्टी उडून गेली. या अपघातात आठ ते दहा मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व जखमी मजुरांवर औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व जखमी मजुरांवर औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भट्टीमध्ये झालेल्या स्फोटावेळी अनेक मजूर तिथे काम करत होते, त्यामुळे जीवितहानीचं प्रमाण वाढलं, अशी माहिती आहे. कंपनी प्रशासनाने जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान, स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी घटनास्थळी भेट दिली. स्फोट कशामुळे झाला हे लगेच समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीमध्ये अलीकडे अनेक भयानक घटना घडल्या आहेत, कारण कंपनी सुरक्षा मानकांकडे लक्ष देत नाही. यात अनेक गरीब मजूर मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा कारवाईची मागणी केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide