तीन मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यावर पुण्यात पाचशे कोटीचा; प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

387 0

पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून राज्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असणार आहे.

पुणे जिल्ह्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचे चांगले वातावरण तयार होईल. रांजणगाव येथील हे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 297.11 एकरमध्ये पसरले जाईल आणि याच्या विकासासाठी 492.85 कोटी रुपये खर्च केले जातील.  यामधील २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.

प्रकल्पाचे लक्ष्य 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 5 हजार रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आहे. काही वेळापूर्वी या प्रकल्पाला नवी दिल्लीत मान्यता मिळाली असल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार आहे.

प्रकल्पातंर्गत आयएफबी रेफ्रिजरेशनने काम सुरु केले आहे, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक आहे. इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग राज्यात या निमित्ताने येणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!