HEALTH WEALTH : वयाची तिशी ओलांडल्यानंतर साधारणतः महिलांचे बाळंतपण १ तरी झालेले असते. तर पुरुष पैसे कमावण्याच्या शर्यतीत स्थैर्य मिळवण्याच्या प्रयत्नांत असतो. सध्याची जीवनसाहिली पाहता दोघेही एकमेकांची कामे वाटून घेतात. त्यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठे झाले आहेत. कमी झोप आणि अधिक विचहर यांमुळे साधारणतः ३० नंतर शरीर थकू लागते. अशावेळी योग्य वेळी तपासण्या आजारांपासून लांब राहण्यासाठी मदत करतील, तर किरकोळ आजारांसाठी लगेच दवाखाना गाठणे देखील बंद करावे. त्यामुळे शरीराला नैसर्गिक रित्या लढण्याची ताकद कायम राहते.
डाॅक्टरांना विचारल्या शिवाय आपल्र्या मनाने सतत वेदनाहारक गोळ्या घेऊ नका.त्याचा किडणीवर वाईट परिणाम होतो. डाॅक्टरी सल्लयाशिवाय पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेऊ नये.
येता जाता जरा काही झाले की क्रोसीन,मेटॅसिन गोळ्यांची सवय लावून घेऊ नये.
टी.व्ही.वरच्या जाहीराती बघून संतती प्रतिबंधक गोळ्या घेऊ नका.त्याची शहानिशा आपल्या डाॅक्डरांकडून करून घ्या.
चाळीशीनंतर बोन डेन्सिटी करून घ्यावी कारण हाडे ठिसूळ होऊ लागतात व वारंवार फ्रॅक्चर होण्याचा संभव असतो.
रोज रोज गरम काढे,औषधे घेऊ नयेत.त्यापेक्षा आपली इम्युनिटी वाढवावी.सर्दी,खोकला वाफ घेतल्याने आटोक्यात राहू शकतात.
तिखट खाण्यावर निर्बंध असावेत नाहीतर पित्तविकार,अल्सर,फिशर,फिस्टुला,पाईल्स होऊ शकते.तेलकट,तुप्पट,अरबट,चरबट,वडापाव,पावभाजी निश्चितपचनक्रीया बिघडवते.
चाळीशीनंतर प्रोस्टेट ग्लॅंडचीही तपासणी करून च्यावी.
स्त्रियांनी स्तनावरच्या गाठींची तातडीने तमासणी करून घ्यावी.तसेच मुलींनी वर्षातून एकदा मॅमो टेस्ट करून घ्यावी.
धूम्रपान व मद्यपान गंभीर रोगांना आमंत्रण देते.आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी दीर्घश्वसन,योग,ॐकार,
स्पायरोमीटर फार फायदेशीर.
जेवताना चावून चावून घास पचनायोग्य करावा. आतड्यांना त्रास होता कामा नये. जेवताना घासागणिक पाणी पिऊ नये.उभ्याने कधीही पाणी पिऊ नये.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            