केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर राज्यातील प्रकल्प पळवणे ही गुजरात मॅाडेलची पोलखोल’…! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

485 0

पुणे : ‘गुजरात मॅाडेल’चा प्रचार व प्रसार करून २०१४ मध्ये केंद्रात आलेल्या मोदी-शहांच्या गुजरातला अखेर केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्याची वेळ येणे हीच गुजरात विकास मॅाडेलची पोलखोल असून, भाजपचा खोटारडेपणा ऊघडा झाल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्याच्या पार्श्वभुमिवर केली..!

वास्तविक भाजपने २०१४ च्या लेकसभा निवडणूकीत तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री श्री नरेंद्र भाई मोदींना पंतप्रधान पदाचे ऊमेदवार जाहीर केले त्याची पार्श्वभुमीच मुळात ‘कथित विकासाचे गुजरात मॅाडेल’ हे होते. मात्र तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचवेळी कथित गुजरात मॅाडेलचा पर्दाफाश करून त्यावेळी देखील विकासाच्या व रोजगारीच्या मुद्दयांवर गुजरात पेक्षा महाराष्ट्रच् १ नं वर (पुढे) असल्याचे जाहीर केले होते. व या विषयी खुल्या चर्चेचे आव्हान देखील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लेकसभा निवडणुक काळातच वारंवार दिले होते याचे स्मरण देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

मोदी – शहांच्या भाजपला अधिक काळ देशातील जनतेची दिशाभूल करता येणार नाही अखेर वास्तवता ही समोर येतेच असेही गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले. केंद्रातील सत्तेच्या आधारे राजकीय नेत्यांना नामोहरम करून वा प्रचंड अमिषे देवून विविध राज्यातील सरकारे पाडापाडी करण्याचा व ती अस्थिर करण्याचा संविधान विरोधी खेळ फार काळ चालणारा नाही याचे ऊचीत भान भाजप नेत्यांनी ठेवावे असे ही सांगितले. कारण असल्या खेळांमुळे राज्याच्या प्रगतीवर, स्थिरतेवर परीणाम होत असून राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर व पर्यायाने जनतेवरच् याचा अनिष्ट परीणाम होत असल्याचा गंभीर इशारा देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..!

मोदी-शहांचे मित्र व गुजरातचे भांडवलदार उद्योजक यांचा लेकसभा निवडणुकीत भाजपला आर्थिक दृष्ट्या पाठींबा असल्याची चर्चा देखील भाजप च्या गोवा अधिवेशनात खुप रंगली असल्याचे वृत्त देखील पुढे आले होते व त्यामुळेच भाजप ने इतर नेत्यांना सोडून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे ऊमेदवार केले हे देखील सर्वश्रुत होते.. अशी टिपणी ही गोपाळदादा तिवारी यांनी केली..!

Share This News
error: Content is protected !!