पुणेकरांना हुडहुडी! थंडीचा जोर आणखी वाढणार ?

242 0

पुणे : मॉन्सून परतल्यानंतर राज्यात हिवाळा सुरू होऊन हळूहळू थंडीला सुरुवात होते. पुण्यात मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. कडाक्याच्या थंडीची चाहूल पुणेकरांना जाणवू लागली आहे. या आठवड्यातील किमान तापमानात कसे बदल होत गेले आहेत ग्राफिक्सद्वारे पाहूया.

किमान तापमान ( अंश सेल्सिअस )

23 ऑक्टोबर 2022 – 15.8

24 ऑक्टोबर 2022 – 14.4

25 ऑक्टोबर 2022 – 13.7

26 ऑक्टोबर 2022 – 14.3

27 ऑक्टोबर 2022 – 14.3

28 ऑक्टोबर 2022 – 13.8

29 ऑक्टोबर 2022 – 15.8

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्याने आणि सध्या पावसाचे कोणतेही लक्षण नसल्याने, या आठवड्यात थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. साधारणपणे दिवाळीच्या दिवसांमध्ये विदर्भात थंडी जोर धरते. मात्र, यंदा मॉन्सून काहीसा लांबल्याने थंडीचही अपेक्षेप्रमाणे उशिरा आगमन झालं.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पहाटे कडाक्याची थंडी पडत असून, दिवसभर ‘ऑक्टोबर हिट’चे चटके बसतात आणि सायंकाळ होताच हवेत गारवा पसरतो आहे. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता अधिक जाणवते. राजस्थानकडून मध्य भारताकडे थंड वारे वाहू लागल्याने मध्य प्रदेश, छत्तीसगडसह महाराष्ट्र आणि विदर्भातही सध्या थंडीची सौम्य लाट पसरली आहे. त्याचा प्रभाव शहरासह राज्यातही जाणवू लागला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, उत्तर भारतातील पहाडी भागांत बर्फवृष्टी सुरू झाल्याने काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!