महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्य सरकार आणि काही जिल्ह्यांच्या बँकांच्या संगनमताने राज्यातील 49 सहकारी साखर कारखाने खाजगी मालकीचे करण्याच्या प्रकरणातून 25 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक खुलासा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणातील अधिक तपासाच्या परवानगीसाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या विषयाची माहिती ज्येष्ठविधीज्ञ ऍड. सतीश तळेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे तात्कालीन 76 संचालक सहकारी साखर कारखाने सहकारी सूत गिरण्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तात्कालीन मुख्यमंत्री सहकार मंत्री अर्थमंत्री खात्याचे सचिव साखर आयुक्त आणि सहकार आयुक्त यांना आरोपी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणांमध्ये राज्य शेतकरी कामगार महासंघाचे नेते माणिक जाधव यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या घोटाळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याची सहकारी तत्त्वावर चालणारी ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघालेली असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा घोटाळा झाला आहे. असा आरोप माणिक जाधव यांनी केला आहे तर हे प्रकरण मिटवून टाकण्याच्या प्रवृत्तीमुळे तपास अधिकाऱ्यांनी तपासा आधीच शरद पवार यांना क्लीन चीट दिली तर न्यायालयात न्यायाधीशही बदलून मागावे लागले असा आरोप त्यांनी केला आहे.