MAHARASHTRA POLITICS : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे घराण्यातील ‘या’ व्यक्तीची होणार राजकारणात एन्ट्री; वाचा सविस्तर

276 0

(इंदापूर) पुणे : ठाकरे घराण्यातील ‘या’ व्यक्तीने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्या विषयी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “सध्या तरी राजकारणात येण्याचा विचार नाही, पण नाही म्हणत नाही”. असे वक्तव्य करून चर्चेला नवीन विषय दिला आहे. हे वक्तव्य केले आहे ठाकरे घराण्यातील निहार ठाकरे यांनी… निहार ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत.

इंदापूरमध्ये टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना निहार ठाकरे म्हणाले की, “ठाकरे गटाने दिलेली २ लाख 50 हजार प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने रद्द केली आहे ,हे आत्ताच समजले. तसेच ही सर्व प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या फॉरमॅटमध्ये नव्हती. याचा नक्कीच फटका हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसू शकतो. यात प्रमुख मुद्दा असा आहे की, बहुमत कुणाकडे आहे ? ज्यांच्याकडे जास्त आमदार,खासदार असतील त्यांच्याकडे… ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांनाच निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह देईल. तर या नियमानुसार निवडणूक आयोग बाळासाहेबांची शिवसेना यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल. असा विश्वास निहार ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच शिंदे गटाशी जवळीक असलेले निहार ठाकरे म्हणाले की, जर राजकारणात प्रवेश केलाच. तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Share This News
error: Content is protected !!