खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणी; भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणास सुरुवात 

359 0

भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे भारतात चार वाजून 17 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली 2022 या वर्षातील हे शेवटचं सूर्यग्रहण असून इटली मधून सर्वप्रथम सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात झाली तर नॉर्वे आणि तुर्की या देशांमध्ये सूर्यग्रहण दिसते आहे.

पुण्यातून पाहताना दुपारी ४ वाजून ५१ मिनिटांनी चंद्र सूर्याच्या एका बाजूला स्पर्श करतानाचे दृश्य दिसेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी चंद्राने सूर्याचा सर्वाधिक २३ टक्के भाग झाकल्याचे दिसून येईल. खंडग्रास ग्रहणाच्या या मध्य अवस्थेनंतर अमावस्येचा चंद्र पुन्हा सूर्यासमोरून बाजूला होऊ लागेल. ग्रहणाची समाप्ती सायंकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी होणार असली, तरी पुण्यात सूर्यास्त ६ वाजून ०५ मिनिटांनी होणार असल्याने ग्रहण अवस्थेतच सूर्यास्त होतानाचे दृश्य आकाशप्रेमींना दिसेल.

दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, सुरत, पुणे, जयपूर, इंदूर, ठाणे, भोपाळ, लुधियाना, आग्रा, चंदीगड, उज्जैन, मथुरा, पोरबंदर, गांधीनगर, सिल्वासा, सुरत आणि पणजी ही काही अतिरिक्त शहरे आहेत जिथे आपण सूर्यग्रहण एका तासापेक्षा जास्त काळ पाहू शकता. तिरुवनंतपुरम, पटना, मंगळुरू, कोयंबटूर, ऊटी, वाराणसी आणि मंगळुरू. आयझॉल, दिब्रुगड, इम्फाल, इटानगर, कोहिमा, सिलचर आणि अंदमान निकोबार बेटाला ग्रहण पाहता येणार नाही.

Share This News
error: Content is protected !!