पुणे : संधी सोडू नका..! खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी मोफत गॉगल्स; अश्र्विनी कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयातून उपलब्ध

328 0

पुणे : आज मंगळवार, २५ ऑक्टोबर २०२२ खंडग्रास सूर्यग्रहणाचा आज लुटा आनंद…! सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे धोकादायक असते. त्यासाठी वापरण्यात येणारे गॉगल्स सूर्यग्रहण संपेपर्यंत माझ्या जनसंपर्क कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत..!

पुण्यातून पाहताना दुपारी ४ वाजून ५१ मिनिटांनी चंद्र सूर्याच्या एका बाजूला स्पर्श करतानाचे दृश्य दिसेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी चंद्राने सूर्याचा सर्वाधिक २३ टक्के भाग झाकल्याचे दिसून येईल. खंडग्रास ग्रहणाच्या या मध्य अवस्थेनंतर अमावस्येचा चंद्र पुन्हा सूर्यासमोरून बाजूला होऊ लागेल. ग्रहणाची समाप्ती सायंकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी होणार असली, तरी पुण्यात सूर्यास्त ६ वाजून ०५ मिनिटांनी होणार असल्याने ग्रहण अवस्थेतच सूर्यास्त होतानाचे दृश्य आकाशप्रेमींना दिसेल.

सूर्यग्रहण सूर्यास्ताच्यादरम्यान होत असल्याने पश्चिम क्षितिज दिसेल, अशा जागेवरून पाहिल्यास खंडग्रास सूर्यग्रहणाचा सर्व अवस्था पाहता येतील. तसेच, सूर्यास्तादरम्यान सूर्याचे तेज कमी झालेले दिसत असले तरी उघड्या डोळ्यांनी किंवा थेट टेलिस्कोपद्वारे ग्रहण पाहणे डोळ्यांसाठी धोकादायक असेल. खास सूर्यग्रहण पाहण्यासाठी वापरण्यात येणारा गॉगल, सोलार फिल्टर, टेलिस्कोपच्या साह्याने सूर्याची प्रतिमा भिंतीवर किंवा पडद्यावर घेऊन किंवा पिन होल कॅमेऱ्याच्या साह्याने ग्रहण पाहावे, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.

मा.नगरसेविका अश्र्विनी नितीन कदम जनसंपर्क कार्यालय :
पत्ता- गुरुकृपा टॉवर, अरण्येश्वर चौक, पुणे-०९.
9011902525

Share This News
error: Content is protected !!