Ground Zero : पुण्यनगरी की ‘ट्रॅफिकनगरी’ ? पुण्यात सर्वत्र तुफान वाहतूक कोंडी

478 0

पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याचा नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा लागतोय.

शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून अनेकदा या रस्त्यांवर वाहतूक पोलीसच पाहायला मिळत नाहीत. त्यामुळं ऐन दिवाळीत पुणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी…या वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीविषयी नागरिकांना विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूयात…

शहरातील वाहतूककोंडीसंदर्भात नुकतंच भाजपाच्या शिष्टमंडळानं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देखील दिलं.  पुण्यात वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीविषयी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली .

एकंदरीतच काय तर प्रशासनाला याबाबत विचारलं असता प्रशासन कधी पाऊस तर कधी मेट्रोच्या कामाचं कारण पुढं करतं मात्र असं असलं तरी पुणेकरांची या वाहतूककोंडीतून कधी सुटका होणार याचं उत्तर सध्या तरी कुणाकडंच नाही.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide