पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लवकरच दोनशे पोलीस शिपाई पदासाठी भरती : चंद्रकांत पाटील

218 0

पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पिंपरी-चिंचवड येथील ही पहिलीच आढावा बैठक होती.

चंद्रकांत पाटील यांनी या आढावा बैठकीदरम्यान शहरातील विविध प्रकल्प आणि प्रश्नांची माहिती घेतली. महापालिका प्रशासनानं पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं बंधनकारक केलं होतं मात्र सोसायटीधारकांच्या भावनांचा विचार करुन ओला कचरा संकलित करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही ‘जैसे थे’ ठेवण्यात यावी, नवीन बांधकाम प्रकल्पांना ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करण्यात यावेत, अशा सूचना केल्या तर ओला कचरा संकलन आणि विल्हेवाट याबाबत ठोस धोरण ठरवण्याबाबत समिती स्थापन करण्यात येईल, असं सांगितलं.

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लवकरच आणखी दोनशे पोलीस शिपाई पदासाठी भरती करण्यात येईल आणि त्याची प्रक्रिया देखील लवकर सुरू होईल, अशी माहिती दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!