Breaking News

‘सुरोत्सवा’ने रसिक मंत्रमुग्ध; राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने

350 0

पुणे : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले होते. ‘कोथरूड सुरोत्सव’ उत्सव सुरांचा दिवाळी पहाट आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांनी नॉर्थ डहाणूकर मैदान, कोथरूड पुणे येथे केले असून कार्यक्रमाचे नियोजन डी के एंटरटेंन्टमेंटस् यांनी पाहिले.

कार्यक्रम सौ.हर्षाली दिनेश माथवड (मा, नगरसेविका, पुणे मनपा) आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड यांच्यावतीने राहुल देशपांडे, अमृता नातू यांच्या शास्त्रीय गायन, सदाबाहर गाीतांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिकली. काल रात्री जोरदार पाऊस झाला असतांना देखील आज पहाटे पावसाची तमा न बाळगता कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. 1600 पेक्षा अधिक रसिक कार्यक्रमास उपस्थित होत तर ऑनलाईन सुमारे 2000 नागरीक सहभागी झाले होते.

तसेच 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 05:30 वाजता सुरांच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा सदाबाहर गाणे सादर करणार असून सूत्रसंचालन समीरा जोशी करणार आहेत. यावेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!