काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ‘या’ आजाराने आहेत त्रस्त

342 0

नवी दिल्ली : 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराणे व्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर अखेर मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोठा राजकीय प्रवास पाहता काँग्रेसला पुन्हा उभारी मिळेल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्याबाबत एक माहिती समोर आली आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या ऐंशी वर्षाचे आहेत. तर त्यांना गुडघेदुखीचा मोठा त्रास आहे. या गुडघेदुखीमुळे त्यांच्यावर 2017 वर्षांमध्ये एम्स रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया देखील पार पडली. त्यानंतर त्यांना काहीसा आराम मिळाला. परंतु ही गुडघेदुखी त्यांच्यासाठी मोठी त्रासदायक ठरली.

या वयामध्ये गुडघेदुखीचा त्रास होणे जितकं नैसर्गिक आहे, तितकच त्या व्यक्तीसाठी त्रासदायक नक्कीच ठरते. त्यामुळेच चालताना, जमिनीवर बसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide