शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

272 0

पुणे : शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज आदेश निर्गमित केले आहे.

याबाबत नागरिकांनी त्यांच्याकडील सूचना, हरकती असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पुढील १५ दिवसात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाही, असेही आदेशान्वये कळविण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!