शिरूर तालुक्यात फटाक्याच्या दुकानाच्या परिसरात फटाके उडविण्यावर बंदी

253 0

पुणे : उपविभागीय दंडाधिकारी पुणे यांनी शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे व कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्याचे आदेशीत केले आहे.

शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी (पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीसाठी लागू राहतील.

प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी कळविले आहे.

Share This News
error: Content is protected !!