नोरा फतेहिच्या डान्स परफॉर्मन्सला बांगलादेशमध्ये मनाई; कारण वाचून चकित व्हाल

371 0

नोरा फतेही एक वर्साटाइल डान्सर आहे. विशेष करून बेली या डान्सच्या प्रकारासाठी प्रसिद्ध असलेली ही सुंदर अभिनेत्री बॉलीवूडमध्ये तर प्रसिद्ध आहेच. पण जगभरात देखील तिचे अनेक फॅन्स आहेत. तरुणांसह तरुणी देखील तिच्या डान्स स्टाईलमुळे तिच्या प्रेमात पडलेल्या आहेत. सध्या कलर्स टीव्हीवर झलक दिखला जा या शोची जज असलेल्या नोराला मात्र बांगलादेश न डान्स परफॉर्मन्ससाठी मनाई केली आहे. 

काय आहे प्रकरण

तर झालं असं की, बांगलादेशातील ढाका येथे एका कार्यक्रमासाठी डान्स परफॉर्म करण्यासाठी नोराला आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु बांगलादेश सरकारने तिला या कार्यक्रमांमध्ये येण्यास बंदी घातली. याचे कारण आहे की डॉलर वाचवण्यासाठी हा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. याबाबत बांगलादेश संस्कृतिक मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे.

वैश्विक परिस्थिती लक्षात घेता विदेशी मुद्रा भंडारवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून नोराला या इव्हेंटमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. वुमेन लीडरशिप कॉर्पोरेशन या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. तिच्या डान्स परफॉर्मन्ससह तिला अवॉर्ड देखील या ठिकाणी देण्यात येणार होता. परंतु विदेशी मुद्रा भंडारवर परिणाम होऊ नये म्हणून डॉलरमध्ये भरपाई करण्यास बँकांनी प्रतिबंध घातल्याच कारण देऊन बांगलादेश सरकारने नोराला या डान्सशो मध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे.

Share This News
error: Content is protected !!