BIG NEWS : BCCI च्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती, तर कोषाध्यक्षपदी आशिष शेलार

466 0

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिव पदी जय शहा आणि कोषाध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

BCCI च्या पदाधिकारी निवडणुकीसाठी 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये ही निवडणूक पार पडली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले.

रॉजर बिन्नी हे कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. रॉजर बिन्नी यांनी 1979 ते 1987 या कार्यकालामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आजपर्यंत सत्तावीस कसोटी सामन्यांमध्ये 830 धावा केल्या असून 72 एक दिवसीय सामन्यांमध्ये 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकवले आहे. 27 कसोटींमध्ये 47 विकेट्स घेतलेले रॉजर बिन्नी यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर त्यांचा 1983 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!