जुन्नर : पावसाचा हाहाकार, विजांचा लखलखाट, पिंपरी पेंढार येथे काल रात्री पडलेली वीज कॅमेऱ्यात कैद

375 0

पिंपरी पेंढार : मंगळवारी रात्री पुणे आणि परिसरात पावसाने हाकाकार केला. भर शहरातले रस्ते अक्षरश: नदी-नाल्यासारखे असल्यासारखे वाहत होते . शिवाजीनगर परिसरात रात्री ११ः३० पर्यंत तब्बल ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील व्यवस्थापनाचा एकीकडे बोजवारा उडालेला असताना पुणे आणि परिसरात देखील तुफान पाऊस झाला आहे.

विजांच्या लखलखाटासह ग्रामीण भागाला देखील पावसाने झोडपून काढले. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील एक व्हिडिओ TOP NEWS MARATHI च्या हाती लागला आहे. विजेचा हा लखलखाट पाहून अंगावर शहारा येईल असा हा विडिओ आहे. गावातील एका शाळेजवळ वीज कोसळतानाची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

अधिक वाचा : पाऊसाचा हाहाकार; अग्निशमन दलाकडून 12 जणांची सुखरुप सुटका

Share This News
error: Content is protected !!