पितांबरीचा वापर न करता घरातल्या तांब्या पितळाची भांडी चमकतील अगदी नव्यासारखी

679 0

सण-वार जवळ आले की आणखीन एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे देवाची तांब्या पितळेची भांडी साफ करणे. तांब आणि पितळेचे भांडे कालांतराने काळे पडू लागतात आणि मग त्यांना साफ करताना खूप जड जाते. बाजारांमध्ये पितांबरी, भैय्या पावडर यांपासून ही भांडी छान साफ होतात. पण आज घरातल्याच काही वस्तू वापरून आणि त्यासह तुमची मेहनत देखील कमी करणार आहे. चला तर मग पाहूया त्यासाठी आपल्याला नक्की काय करायचे…

घरातले जेवढे तांब्या पितळाचे भांडे आहेत ते एकाच दिवशी साफ करायला घेतले तरीही चालेल. मग जितके भांडे आहेत ते सर्व पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून जातील एवढ्या मोठ्या टपामध्ये गरम पाणी घ्यायचे आहे. या गरम पाण्यामध्ये एक चमचा सायट्रिक ऍसिड (लिंबू सत्व), एक पूर्ण लिंबू पिळून टाकायचे आहे. त्याचबरोबर दोन चमचे मीठ यामध्ये घालायचे आहे. त्यासह वापरात असाल तर लिक्विड सोपं देखील या पाण्यात घालावे. सायट्रिक ऍसिडच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगर देखील घालू शकता.

आता हे संपूर्ण पाणी व्यवस्थित थोडे हलवून घ्या . जेणेकरून सायट्रिक ऍसिड (लिंबू सत्व) त्यामध्ये पूर्णपणे विरघळेल. आपले सर्व तांब्या पितळेचे-भांडे या पाण्यामध्ये अगदी रात्रभर भिजत ठेवा. दिवे तेलकट होतात ते देखील यामध्ये भिजत ठेवा. दिव्याचे जे भाग वेगवेगळे होऊ शकतात ते सर्व भाग वेगळे करून यामध्ये टाका. सकाळी या पाण्यामध्ये हे सर्व भांडे व्यवस्थित साफ होतात. तुमचं निम्मं काम इथंच झालेलं असतं.

तर मग आता प्रत्येक भांड तुम्हाला फक्त हातावर रांगोळी घेऊन घासून काढायच आहे. हे भांड साफ करताना तुम्हाला जाणवेल की ते अगदी सहज साफ होईल. ताकद देखील तुम्हाला खूप कमी लावावी लागेल. स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर प्रत्येक भांड धुतल्यानंतर लगेचच मऊ आणि स्वच्छ कापडाने आधी पुसून घ्या.

हे सर्वात महत्त्वाचे आहे की तांब्या-पितळेचे भांडे एकदा धुतल्यानंतर त्यावर अधिक वेळ पाण्याचे थेंब राहू देऊ नका. त्या ठिकाणी लगेचच काळे डाग पडतात त्यामुळे भांड स्वच्छ धुतल्यानंतर लगेचच स्वच्छ कापडाने पुसूनच बाजूला ठेवा आणि मग वाळू द्या. भांडे आगदी नव्यासारखी चकचकतील…

Share This News
error: Content is protected !!